बोदवड येथे जम्मा जागरण उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 20:36 IST2018-12-09T20:34:59+5:302018-12-09T20:36:56+5:30
समस्त मारवाडी समाजबांधवांच्या आराध्य दैवत असलेल्या रुणेचा धाम रामदेवजी बाबांचा जम्मा (भजन) संध्या कार्यक्रम शनिवारी रात्री उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘प्रभू अवतारी है के लीला है न्यारी’सारख्या भजनांनी लक्ष वेधले

बोदवड येथे जम्मा जागरण उत्साहात साजरा
बोदवड, जि.जळगाव : समस्त मारवाडी समाजबांधवांच्या आराध्य दैवत असलेल्या रुणेचा धाम रामदेवजी बाबांचा जम्मा (भजन) संध्या कार्यक्रम शनिवारी रात्री उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘प्रभू अवतारी है के लीला है न्यारी’सारख्या भजनांनी लक्ष वेधले
राजस्थानी गणेश मंडळ युवा मंचतर्फे आयोजित या कार्यक्रमात कथा वाचन रमेश जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय जैस्वाल, रुपेश अग्रवाल, मनोज शर्मा, कल्पेश शर्मा, मयूर गुप्ता, योगेश अग्रवाल, निखिल अग्रवाल, मयूर अग्रवाल, अक्षय शर्मा, प्रीतम वर्मा, पवन अग्रवाल, सूरज दायमा, पीयूष शर्मा, प्रेम शर्मा, अजय शर्मा, गोपाल व्यास, राजू बंडू, विक्की शर्मा, अनमोल अग्रवाल, यश अग्रवाल, स्वप्नील जैस्वाल आदींनी परिश्रम घेतले. यावेळी समस्त मारवाडी महिला मंच व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.