जळगाव मनपा निवडणूक : सोडतीनुसार होणार चिन्हाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:48 IST2018-07-16T14:44:21+5:302018-07-16T14:48:36+5:30
मनपा निवडणुकीसाठी १८ रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ४२ मुक्त चिन्ह निश्चित करण्यात आली आहे.

जळगाव मनपा निवडणूक : सोडतीनुसार होणार चिन्हाचे वाटप
ठळक मुद्दे६ राष्टÑीय तर दोन प्रादेशिक पक्षांचे चिन्ह४२ मुक्तचिन्हांमधून निवडावी लागणार तीन चिन्ह१८ रोजी होणार चिन्हांचे वाटप
जळगाव - मनपा निवडणुकीसाठी १८ रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ४२ मुक्त चिन्ह निश्चित करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारांना तीन चिन्हांची निवड करायची असून, त्याद्वारे १८ रोजी उमेदवारांना सोडतव्दारे चिन्हा वाटप करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून ५७ चिन्ह निश्चित करुन पाठविण्यात आली आहेत. यामध्ये ६ चिन्ह राष्ट्रीय पक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. तर दोन चिन्ह शिवसेना व मनसे तर सात चिन्ह इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यासह अपक्ष उमेदवारांसाठी ४२ चिन्हांची यादी राज्य निवडणूक आयोगाने पाठविली आहे.