शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 10:17 PM

 आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना ...

ठळक मुद्दे२ लाख ९ हजार हस्तगत कल्याण रेल्वेस्थानकावरुन आवळल्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाण

 

आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना गुरुवारी सकाळी सव्वा पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कल्याण रेल्वेस्थानकावर मुसक्या आवळल्या. रेल्वेतून तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला घेरले.सातगाव डोंगरी येथील शेतकरी संजय विष्णु वाणी (वय-४५) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग १ जून रोजीरात्री साडे आठ वाजता बसस्थानकातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात धागेदोरे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंदा शांताराम हटकर (पाटील) रा.मंगलपुरी, मेहरुण, जळगाव याला रविवारी रात्री पकडले होते, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली होती. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार केल्यानंतर बुधवारी दुपारी त्याची रुग्णालयातून सुटका झाली. त्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली. पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाणआनंदा याला पकडल्यानंतर रितेश हा मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक फौजदार मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, विनोद पाटील, संजय सपकाळे, राजेंद्र पाटील,रामचंद्र बोरसे, सुशील पाटील, विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांचे पथक तयार केले होते. त्यातील काही जण तीन दिवसापासून कल्याण व उल्हासनगरात ठाण मांडून होते. रितेश हा कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर असून तो फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगरला थांबलेले पथक ३० मिनिटात तेथे पोहचले व काही कळण्याच्या आत त्याला घेरले. त्याला सायंकाळी जळगावात आणण्यात आले. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कुराडे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

आनंदा हटकरला कोठडीदरम्यान, आधी अटकेत असलेल्या आनंदा हटकर याला तपासाधिकारी एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा