शिवरायांना जळगावकरांचा मानाचा मुजरा, शिवजयंतीचा अपूर्व उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:31 IST2020-02-19T12:31:28+5:302020-02-19T12:31:52+5:30
शोभायात्रेने वेधले लक्ष

शिवरायांना जळगावकरांचा मानाचा मुजरा, शिवजयंतीचा अपूर्व उत्साह
जळगाव : शिवजयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीर्फे सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेतून शिवराज्याचे दर्शन घडले.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून शोभायात्रेला सुरुवात होऊन नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थ मैदानाजवळ मिरवणुकीचा समोराप झाला. शोभायात्रेत विविध देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.
या सोबतच विविध संस्था, संघटनांच्यावतीने शहरात मिरवणुका सुरू आहे.