Jalgaon's cracked low noise this year | जळगावकरांनी यंदा फोडले कमी आवाजाचे फटाके
जळगावकरांनी यंदा फोडले कमी आवाजाचे फटाके

जळगाव : दिवाळी म्हणजे फटाके आलेच. मात्र, फटाके फोडण्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळ व विविध सामाजिक संस्थांतर्फे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात आल्यामुळे यंदा जळगावकरांनी कमी आवाजाचे फटाके फोडले आहेत. यामुळे दिवाळीत शहरातील ध्वनी प्रदूषण कमी झाल्याचा अहवाल जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाला नुकताच प्राप्त झाला आहे.
जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी तपासण्यात येत असते. यासाठी २६ ते ३० आॅक्टोंबर या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक व टॉवर चौकातील उंच इमारतीच्या छतावर हाय व्हॅल्यूम ईअर मशिन ठेवण्यात आले होते.
या मशिनद्वारे दर आठ तासाला वातावरणातील ध्वनी प्रदूषणाचे नमुने घेण्यात आले.
यामध्ये सायंकाळी ६ पासून ते दुसºया दिवशी पहाटे ६ पर्यंतचे नमुने घेण्यात आले होते. हे नमुने दररोज नाशिक येथील एका खाजगी संस्थेत ध्वनीची पातळी मोजण्यासाठी पाठविण्यात येत होते. या संबंधिचा अहवाल जिल्हा प्रदुषण नियंत्रण महामंडळाला नुकताच प्राप्त झाला आहे.

२७ तारखेला सर्वांधिक ८७. १ डेसिंबल इतकी झाली नोंद
जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिवाळीच्या काळात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या हाय व्हॅल्यूम ईअर मशिनद्वारे ध्वनी प्रदूषणाचे नमुने घेतले होते. या नमुन्यांचा नाशिक येथून नुकताच अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये २७ तारखेला सर्वाधिक ८७. १ डेसिबल इतक्या ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन असल्याने, जळगावकरांनी फक्त लक्ष्मी पूजनालाच मोठ्या आवाजाचे फटाके फोडले असल्याचे सिद्ध झाले आहे. इतर दिवशी मात्र कमी आवाजाचे फटाके फोडल्यामुळे ध्वनी प्रदूषणाची नोंद ७०.९ ते ८२.८ पर्यंत दाखविण्यात आली आहे.

Web Title:  Jalgaon's cracked low noise this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.