‘रन फॉर युनिटी’मध्ये धावले जळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:17 IST2018-10-31T12:47:14+5:302018-10-31T13:17:24+5:30
जलसंपदामंंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश

‘रन फॉर युनिटी’मध्ये धावले जळगावकर
जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत जळगावकर नागरिक धावले. यामध्ये जलसंपदामंंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश होता.
पोलीस मुख्यालयापासून एकता रॅलीला सुरुवात झाली. तेथून ही रॅली आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, इच्छादेवी चौक, पांडे डेअरी चौक, रथ चौक, घाणेकर चौक, शिवाजी महाराज पुतळ््याकडून पुन्हा पोलीस मुख्यालयाजवळ पोहचून समारोप झाला.
रॅलीमध्ये जलसंपदामंंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदी सहभागी झाले होते.