जळगाव जि. प. अध्यक्षांच्या वाहनाला ओझरजवळ ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:46 IST2019-05-18T13:14:23+5:302019-05-18T13:46:46+5:30
वाहनाचे नुकसान

जळगाव जि. प. अध्यक्षांच्या वाहनाला ओझरजवळ ट्रकची धडक
जळगाव : शनिवारी पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सामील होण्यासाठी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या असताना पहाटे ३ वाजता नाशिक जवळील ओझर गावाजवळ त्यांच्या खाजगी वाहनाचा जबर अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जीवित हानी झाली नाही.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौºयासाठी आले असून त्यासाठी उज्ज्वला पाटील, पती माजी जि.प. अध्यक्ष मच्छिंद्र पाटील व परिवारासह मुंबईहून रात्री बारा वाजता जळगावला यायसा निघाले. नाशिक जवळील ओझर गावाजवळ गतिरोधकावर गाडी असताना मागून ट्रॅकने जोरदार धडक दिली. त्यात पाटील यांच्या वाहनाचा भाग पूर्णत: चेपला गेला. मागच्या सिटवर बसलेल्या उज्ज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने बचावला. किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यासह ट्रकही ओझर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.