शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जळगावनजीक भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:10 IST

बोरनारचे दोघे गंभीर

ठळक मुद्देशिरसोलीत अपघात दुचाकीचा अक्षरश: चुराडा

जळगाव/शिरसोली : शिरसोली प्ऱबो़ येथील एस़टी़ बसस्टॅण्डसमोर भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३़१५ वाजेच्या सुमारास घडली़ अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला़ इब्राहीम रफीक पटेल (वय-१९) व शोएब मणियार (वय-२८, दोन्ही़ रा़ बोरनार) अशी दुचाकीवरील जखमी झालेल्या दोन्ही तरूणांची नावे असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़बहिणीसाठी शिलाई मशिन घेण्यासाठी बोरनार येथील इब्राहीम हा मित्र शोएब याला सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी जळगावात दुचाकी (एमएच़१९़एए़१४५३) ने आला होता़ गोलाणी मार्केटमधून शिलाई मशिन खरेदी केल्यानंतर दोन्ही बोरनारच्या दिशने रवाना झाले़ इब्राहीम हा दुचाकी चालवत होता़ तोच चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयातील डॉ़ गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) हे कार (क्ऱएमएच़१९़ सीयू़३८५४) ने जळगावच्या दिशेने येत होते़ तोच या भरधाव असलेल्या कार व दुचाकीमध्ये शिरसोली प्ऱबो येथील एस़टी़ बस स्टॅण्डसमोर दुपारी समोरासमोर धडक झाली़अपघातात होताच दुचाकीवरील इब्राहीम हा कारवर आदळला गेला़ तर मागे बसलेला शोएब हा खाली कोसळला़दुचाकीचालक गंभीर जखमीकारवर आदळला गेल्यामुळे इब्राहीम याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला़ तर दुसरीकडे दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला़परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली़ तोच गावातील जिभू पाटील व सुपडू पाटील यांनी जखमी इब्राहीम व शोएब या दोघांना रिक्षातून नेत जिल्हा रूग्णालात उपचारार्थ दाखल केले़ मात्र, अपघात झाल्यानंतर कार व मोबाईल सोडून डॉ़ गायकवाड यांनी तेथून पळ काढला़ यानंतर ग्रामस्थांनी कारची चावी व मोबाईल त्वरीत पोलीस पाटील यांच्याकडे दिली़ या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.शिलाई मशिनचे तुकडेधडक एवढी जबर होती की शोएब यांच्या हातातील शिलाई मशिनचे दोन ते तीन तुकडे झाले़ कारच्या पुढील भागासह काचेचेही नुकसान झाले आहे़ ग्रामस्थांनी अपघातानंतर त्वरीत एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे जितेंद्र राठोड यांच्यासह काही कर्मचाऱ्यांनी धाव घेतली़ दरम्यान, या अपघातात इब्राहीम यास गंभीर दुखापत झाली आहे़ तर शोएब हा किरकोळ जखमी झाला आहे़ जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर इब्राहीम यास त्वरीत खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले़

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव