जळगावच्या तापमानात एका दिवसात चार अंशाने घट

By Admin | Updated: April 23, 2017 16:59 IST2017-04-23T16:59:27+5:302017-04-23T16:59:27+5:30

हवेचा जोर वाढल्याने जळगावच्या तापमानात एका दिवसात चार अंशाने घट होऊन रविवारी पारा 40 अंशावर आला.

Jalgaon temperature decreases by four degrees in one day | जळगावच्या तापमानात एका दिवसात चार अंशाने घट

जळगावच्या तापमानात एका दिवसात चार अंशाने घट

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 23 - जळगाव शहरासह जिल्ह्यात चैत्रातच वैशाख वणवा पेटल्याने अंगाची लाहीलाही होत होती. पशुपक्ष्यांसह सारेच हैराण झाले होते. रविवारी मात्र वातावरणात काहीसा बदल झाला.  हवेचा जोर वाढल्याने जळगावच्या तापमानात एका दिवसात चार अंशाने घट होऊन रविवारी पारा 40 अंशावर आला. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. आठवडाभरात तापमानात आणखी घट होवून दोन दिवसात जिल्ह्यात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Jalgaon temperature decreases by four degrees in one day