शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पर्यवेक्षकाने केली विद्यार्थिनीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:52 IST

नंदीनीबाई विद्यालयातील प्रकार

ठळक मुद्दे वाद पोलिसातरॅगींगचीही केली विद्यार्थिनीने तक्रार

जळगाव : विद्यार्थिनींच्या दप्तरातून पेन व पैसे चोरी केल्याच्या तक्रारीवरुन पर्यवेक्षकांनी एका विद्यार्थिनीला चोर म्हणून हिणवत मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नंदीनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात घडली. दरम्यान, पालकांनाही तुमची मुलगी चोर आहे, तिला घेऊन जा असे या पर्यवेक्षकाने सुनावल्याने वाद वाढून तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला होता. रॅगींगचीही तक्रार विद्यार्थिनीने केली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील विद्यार्थिनी नंदीनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी पर्यवेक्षक एन. व्ही. महाजन यांनी या विद्यार्थिनीला मारहाण केली. हा प्रकार तिने घरी पालकांना सांगितला, त्यानंतर तिची आई व वडील शाळेत आले. पर्यवेक्षक महाजन यांना जाब विचारला असता ‘तुमची मुलगी चोर आहे, तिला घरी घेऊन जा’ अशा शब्दात पालकांना खडसावले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले.निरीक्षकांच्या दालनात भरली शाळाविद्यार्थिनी व तिच्या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुील गायकवाड यांनी पर्यवेक्षक महाजन यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी वर्गातील काही विद्यार्थिनींनी या विद्यार्थिंनीची आपल्याकडे चोरीची तक्रार केली. त्यानंतर तिच्या दप्तराची तपासणी केली असता त्यात पाचशे रुपये व पेन आढळून आले. याआधी दोन वर्षापूर्वीही याच विद्यार्थिनीची चोरीबाबत तक्रार झाली होती, असे महाजन यांना सांगितले. तर विद्यार्थिनी व पालकांनी हा आरोप फेटाळून लावत काही विद्यार्थिनी रॅगींग करीत असल्याची तक्रार केली.विद्यार्थिनी व तिच्या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुील गायकवाड यांनी पर्यवेक्षक महाजन यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी वर्गातील काही विद्यार्थिनींनी या विद्यार्थिंनीची आपल्याकडे चोरीची तक्रार केली. त्यानंतर तिच्या दप्तराची तपासणी केली असता त्यात पाचशे रुपये व पेन आढळून आले. याआधी दोन वर्षापूर्वीही याच विद्यार्थिनीची चोरीबाबत तक्रार झाली होती, असे महाजन यांना सांगितले. तर विद्यार्थिनी व पालकांनी हा आरोप फेटाळून लावत काही विद्यार्थिनी रॅगींग करीत असल्याची तक्रार केली.शिक्षकांनी घेतली धावदोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पर्यवेक्षकांनाही समज दिली.काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद आपसात मिटविण्यात आला. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका, कार्यालय प्रमुख आर.आर.गुळवे यांच्यासह शिक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.ंविद्यार्थिनींनी तक्रार केल्याने विद्यालयाचा जबाबदार व्यक्ती या नात्याने विद्यार्थिनीला रागावलो. मारहाण केली नाही. रॅगींगचाही आरोप खोटा आहे. या विद्यार्थिनीबाबत अनेक तक्रारी होत्या.-एन.व्ही महाजन, पर्यवेक्षक

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव