भारत बंद दरम्यान जळगावात दुकानावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:18 IST2020-01-29T12:17:31+5:302020-01-29T12:18:10+5:30
दुकानाचे नुकसान

भारत बंद दरम्यान जळगावात दुकानावर दगडफेक
जळगाव : भारत बंद दरम्यान शहरातील इच्छा देवी चौकानजीक असलेल्या प्लाझा मेन्स पार्लर या दुकानावर दगडफेक करण्यात आली.
सकाळी प्रशांत तुकाराम फुलपगारे हे दुकानावर असताना तेथे बंदचे आवाहन करीत घोळक्याने दगडफेक केली. यात दुकानाच्या काचा फुटल्या. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ व त्यांचे सहकाऱ्यांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे.