शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 20:57 IST

जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी माहेरावरून आलेल्या पत्नीला पतीचा घरात मृतदेह आढळून आला. 

Jalgaon Crime: २ जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे पत्नी शुभांगी या १ जूनलाच माहेरावरून घरी आल्या. घरी येताच त्यांच्यावर मोठा आघात झाला. कारण घरात त्यांच्या पतीचा मृतदेह पडलेला होता. माहेरहून आलेल्या पत्नीला घरात पतीचा मृतदेह दिसल्याने तिने एकच हंबरडा फोडला. पतीच्या अचानक मृत्यूबाबत शुभांगी संशय व्यक्त केला.त्यामुळे पोलिसांनी चारजणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव बढे येथील रहिवासी सुनील उदयभान शेलेकर (३६) व पत्नी शुभांगी शेलेकर (ह.मु. शेंदुर्णी) येथे भाड्याच्या घरात राहत होते. सुनील हे खासगी कामे करत होते.

पत्नी शुभांगी या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. ३१ मे रोजी त्या माहेरी गेल्या होत्या. २ जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. १ जूनला रात्री पत्नी शुभांगी यांनी सुनील यांना फोन लावला; पण लागला नाही. शुभांगी घरी येताच त्यांना पतीचा मृतदेह निदर्शनास पडला.

वाचा >>पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पुत्र ताब्यात

पहूर रुग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. याठिकाणी पत्नी शुभांगी व भाऊ गजानन शेलेकर यांना घातपाताचा संशय आल्याने शवविच्छेदन पहूर येथे न करता जळगाव येथील शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा करण्यात आले.

अपघातात जखमी झाल्यानंतर घरी सोडले होते

सुनील यांचा लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील व अन्य दोन मित्रांनी १ जून रोजी दुपारी पार्टी केली. त्यानंतर १ जून रोजी रात्री एक ट्रॅक्टरचालक मित्र पहूर नाक्यावर भेटला. त्या ट्रॅक्टरवर सुनील बसला. मात्र त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्याचा अपघात घडला. 

ट्रॅक्टरचालकाने गावातील एका साथीदाराला बोलावून घेत जखमी अवस्थेत सुनीलला घरी सोडले, असा ट्रॅक्टरचालकाने कबुली नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. चार संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.

ताब्यात असलेल्या चौघांची पोलिस चौकशी सुरू

पोलिसांनी सुनील मृत्यूप्रकरणात ताब्यात घेतलेल्या चौघांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणातील एका संशयिताने तर अपघातात तो जखमी झाल्याचे सांगितले आहे. उर्वरित तिघांकडूनही त्यांची वेगवेगळी चौकशी करून माहिती घेतली जात आहे. 

पोलिसांनी या चारही जणांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. चौकशीनंतर अनेक मुद्दे बाहेर येतील, असे पोलिसांनी म्हटले असून याप्रकरणी निष्पक्षपाती चौकशी केली जाईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी सांगितले.

मारहाण करून घातपात केल्याचा पत्नीचा आरोप

याबाबत पत्नीने पोलिसांना सांगितले की, अज्ञात मारेकऱ्यांनी माझ्या पतीच्या अंगावर मारहाण करून घातपात केला आहे. मी घरात पोहोचल्यावर पतीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. मारेकऱ्यांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्नी शुभांगी हिने पहूर पोलिसांकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूPoliceपोलिस