शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Jalgaon: पिंपळगाव गोलाईतजवळ खाजगी बस जळून खाक: २५ प्रवाशांसह चालक आणि वाहक बचावले

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: May 27, 2025 14:13 IST

Jalgaon News: पुणे ते  बऱ्हाणपूर- धारणी जाणारी  खाजगी बस  पिंपळगाव गाव गोलाईत ता.जामनेर जि.जळगाव येथे बसने पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक  बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.  जामनेर- पहूर रस्त्यावर हि घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास मंगळवारी घडली आहे.

जळगाव - पुणे ते  बऱ्हाणपूर- धारणी जाणारी  खाजगी बस  पिंपळगाव गाव गोलाईत ता.जामनेर जि.जळगाव येथे बसने पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक  बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.  जामनेर- पहूर रस्त्यावर हि घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास मंगळवारी घडली आहे.

प्राप्त माहिती नुसार एमपी ४८झेडपी ५५३३ क्रमांकाची खाजगी बस पुण्याहून बर्हाणपूर ते धारणी  जात होती. पहूर सोडल्यानंतर  पिंपळगाव गाव गोलाईत गावाच्या जवळ बसने अचानक पेट घेतला. ही बाब  बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करून बस थांबवित सर्व प्रवासी बाहेर काढले. यादरम्यान हवा  मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले .आणि प्रवासी सुखरूप स्थळी हलवित असतानाच बस पूर्ण पणे जळून खाक झाली. बसमध्ये जवळपास पंचवीस प्रवासी असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.  मोठा अनर्थ याठिकाणी टळला आहे.

पोलीस आणि अग्निशमन दल दाखलपिंपळगाव गोलाईत येथील पोलीस पाटील यांनी तातडीने माहिती पहूर पोलीसांना कळविताच पहूर पोलीस कर्मचारी सुभाष पाटील व आकाश देशमुख यांनी अग्निशमन  शेंदुर्णि व जामनेर येथील दलाला पाचारण केले. याठिकाणी शेंदुर्णि येथील अग्निशमन दलाचे शरद बारी, ईश्वर सोणवने,जहिर तडवी, तसेच जामनेर अग्निशमन दलाचे राजेंद्र सोनार, पवन शिंदे, प्रशांत सुतार, मयूर यांनी आगिवर नियंत्रण मिळविले. यादरम्यान पिंपळगाव गोलाईत येथील सौरभ राजपूत, हरिभाऊ राजपूत, सगर शिसोदे,दिपक राजपूत व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सागर पाटील व गावकरी  यांनी मोलाचे  मदत कार्य केले. बचावलेल्या प्रवाशांची नावं पुढील प्रमाणेसंतोष, सोलंकी रा.उडी,गंगाधर मांगीलाल वायफुले,अर्जुन नार्वे,दिलीप सोलंकी, संतोष डावर, जितेंद्र सोलंकी, आशा सावरकर, मुकेश डिकार,सुनील डावरे, भिलवलकर, ऋत्विक पारेकर,पुजा वासकुले,प्रमिला डावर, राजवंती डावर, सुनिता सोलंकी, भारती राठोड, सुनिता मोरले,चालक अजय चोपे व वाहक। दिपक सर्व राहणार बर्हाणपूर, धारणा, खंडवा, मोंद्रा,उडी येथील असल्याचे सांगितले आहे. उर्वरित प्रवासी भयभीत झाल्याने मिळेल त्या वाहनाने  जामनेर कडे रवाना झाले. टायरच्या खालील बाजुस फुगा फुटल्याने टायरने पेट घेतला हि बाब बस मधील प्रवाशाच्या लक्षात आल्याने आम्ही सर्व तातडीने खाली उतरून सुरक्षित स्थळी गेलो.- संतोष लकडिया सोलंकी (प्रवाशी)

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग