जळगाव मनपाची लिफ्ट तब्बल सहा तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:59 IST2018-05-31T22:59:00+5:302018-05-31T22:59:00+5:30
मनपातील २८ कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त झाले, त्यामुळे प्रत्येक विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी वीजेचा लंपडाव सुरु असल्याने मनपाच्या सर्व लिफ्ट बंद झाल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाºयांना आपल्या शेवटच्या दिवशी पायपीट करावी लागली. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

जळगाव मनपाची लिफ्ट तब्बल सहा तास बंद
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३१ : मनपातील २८ कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त झाले, त्यामुळे प्रत्येक विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी वीजेचा लंपडाव सुरु असल्याने मनपाच्या सर्व लिफ्ट बंद झाल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाºयांना आपल्या शेवटच्या दिवशी पायपीट करावी लागली. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
महानगर पालिकेत एकूण सहा लिफ्ट आहेत. मात्र, त्यापैकी तीन लिफ्ट गेल्या दिड वर्षांपासून बंद आहेत. तर मुख्य दोन कॅप्सुल लिफ्ट या नेहमी सुरु असतात. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वीज गायब झाल्यानंतर सर्व मुख्य लिफ्ट बंद पडली. यामुळे दहा ते पंधरा मिनीटे नागरिक यामध्ये अडकून पडले. मनपा कर्मचाºयांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर बंद पडलेल्या लिफ्टचे दरवाजे उघडल्यानंतर नागरिकांना बाहेर काढावे लागले. दरम्यान, एक ते दिड तास वीज बंद असल्याने लिफ्ट देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे मनपा अधिकाºयांसह सामान्य नागरिकांना देखील पायºया चढूनच जावे लागले.