शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : एकनाथराव खडसे यांच्या आवाजात प्रचाराची बनावट क्लीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:47 IST

धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देक्लीप बनावट असल्याचे स्वत: खडसे यांनी स्पष्ट केलआमदाराचे लेटरहेड वापरुनही केली होती तक्रार

जळगाव : भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची एक आॅडीओ क्लीप मोबाईलवर ऐकवली जात आहे. मात्र ही क्लीप बनावट असल्याचे स्वत: खडसे यांनी स्पष्ट केले आहे. गत आठवड्यातही आमदार सुरेश भोळे यांचे बनावट लेटहेड वापरुन खडसेंविरुद्ध उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.आमदाराचे लेटरहेड वापरुनही केली होती तक्रारमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रारीसाठी आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वीच पुढे आला होता. याबाबत आमदार भोळे यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन खडसे यांची बदनामी करणारे बनावटपत्र पाठविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.दानवे यांच्यासमोरही मांडला खडसेंवरील अन्यायाचा प्रकारभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शनिवारी जळगावात आले असता खडसे समर्थकांनी पक्षाकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायकारक व अपमानास्पद वागणुकीबद्दल तक्रारीचा पाढा वाचला होता. स्वत: खडसे यांंनीही आपल्यावरील अन्याय दूर होईल, ती वेळ कधी येणार नाही, असे मत व्यक्त करत नाराजी दर्शविली होती.अशा स्थितीत खडसे यांंना अडचणीत टाकणारी वेगवेगळी प्रकरणे पुढे येत आहेत. यापूर्वी बनावट डीडी तयार करून हायकोर्टात पुराव्या दाखल सादर केल्याबद्दल खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह बॅँक अधिकाºयांविरुध्द गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता आमदारांच्या लेटरहेडवरील बनावट तक्रारीचे प्रकरण ताजे असताना बनावट आॅडिओ क्लीपचे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा आहे.खडसेंच्या मोबाईलवर आली क्लीपही क्लीप खडसे यांच्या मोबाईलवर त्यांना स्वत: ला ऐकण्यास मिळाली. मात्र त्यांनी अशी कोणतीही क्लीप केलेली नसल्याने बनावट आवाज कोणीतरी ही क्लीप तयार केल्याने एकप्रकारे आपली फसवणूकच झाल्याचे खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझ्या आवाजातील अशी बनावट क्लीप परस्पर वापरली जात असेल तर माझ्यावर अप्रत्यक्षरित्या अविश्वास दाखविण्याचा हा प्रकार आहे, असेही खडसे म्हणाले.आधीच त्रास, त्यात पुन्हा क्लीपपक्षाने आदेश दिले असते तर मी आनंदाने क्लीप बनविण्यासाठी तयार झालो असतो. परंतु मागे माझ्या नावाने बनावट चेक प्रकरणात मी त्रास भोगत असताना अशा प्रकारे माझ्या आवाजात आज ही क्लीप केली समोर आली. उद्या इतर कोणतीही क्लीप माझ्या आवाजात तयार होवू शकते, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव