जळगाव महापालिका निवडणूक : पाऊसही बघतोय उमेदवारांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:10 IST2018-07-24T13:10:35+5:302018-07-24T13:10:48+5:30
चिखलात रस्ते तुडवले

जळगाव महापालिका निवडणूक : पाऊसही बघतोय उमेदवारांची परीक्षा
जळगाव : शहरात सलग तिसऱ्या दिवशी भर पावसात प्रचार करण्याची कसरत उमेदवारांना व विविध पक्षाच्या नेतेमंडळींना करावी लागली. सतत होणाºया पावसामुळे रस्त्यांवर चिखल निर्माण झाल असून अशा मार्गावरही उमेवारांना फिरावेल लागत आहे. यामुळे पाऊसही मतदारांप्रमाणेच उमेदवारांची व राजकीय पक्षांचीही परीक्षा बघत असल्याचे बोलले जावू लागले आहे.
मनपा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच व प्रचाराने वेग घेतलेला असतानाच शहरात पावसानेही जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस झाला असताना शनिवारीही पावसाने हजेरी लावली. काही वेळ जोरदार तर इतर वेळेस रिमझिम पाऊस सुरुच होता. दरम्यान रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही पावसाची पर्वा न करता रविवारी सुटीच्या दिवसाची संधी साधत सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार केला. सोमवारी सलग तिसºया दिवशीही सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने उमेदवार, राजकीय पक्षांचे नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना भर पावसातच प्रचारासाठी फिरावे लागले.
छत्र्यांच्या माध्यमातूनही प्रचार
पावसात फिरत असताना कार्यकर्ते व नागरिकांचा पावसापासून बचाव व्हावा म्हणून काही पक्षातर्फे आपल्या पक्षाचे चिन्ह असलेल्य छत्री वाटप करण्यात आल्या आहेत. या छत्र्या प्रचार फेºयांमध्ये दिसू लागल्याने छत्र्यांच्या माध्यमातूनही पक्षाचा व उमेदवारांचा प्रचार होताना दिसून येत आहे. तर पावसामुळे नागरिकांना एकप्रकारे छत्र्यांची गिफ्टच मिळाली आहे.