जळगाव : मनपा निवडणुकीसाठी बुधवारी अपक्ष व इतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये अपक्ष उमेदवारांची सर्वाधिक पसंती बॅट या चिन्हाला दिसून आली. १६ अपक्ष उमेदवारांना ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले तर १३ अपक्ष उमेदवारांना नारळ हे चिन्ह मिळाले.मनपा च्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व अपक्ष उमेदवारांसह काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील यावेळी आले होते. अपक्ष उमेदवारांनी पहिले तीन या पसंती क्रमानुसार चिन्हांची निवड करुन ती यादी निवडणूक विभागाकडे सादर करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व उमेदवारांनी आपली यादी निवडणूक विभागाकडे सादर केली होती.हिंदू महासभेलाही मिळाले नारळ चिन्हहिंदू महासभा पक्षाला अधिकृत चिन्ह नसल्याने त्यांना नारळ हे चिन्ह देण्यात आले. एमआयएम पक्षाला अधिकृत पतंग हे चिन्ह असल्याने त्यांचा सहाही उमेदवारांना पतंग हे चिन्ह मिळाले.बीआरएसपी च्या एका उमेदवाराला नगाडा हे चिन्ह मिळाले. तर हेच चिन्ह एका अपक्ष उमेदवाराला देखील देण्यात आले. १२ उमेदवाराना कपबशी, टीव्ही चे चिन्ह ६ उमेदवारांना मिळाले. गॅस सिलींडर ४, रोडरोलर व कढई २, मेणबत्ती ४, पंखा ३ तर ब्रश, इस्त्री,टेबल, टोपली, फलंदाज, फुगा , कॅमेºयाचे चिन्ह प्रत्येकी एका उमेदवाराला मिळाले.सारखेच पसंतीक्रम आल्यानेसोडतीव्दारे केली निवडकाही अपक्ष उमेदवारांनी एकाच चिन्हाला पसंतीक्रम दिल्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांनी सोडतीव्दारे चिन्हांचे वाटप करण्यात आले. तर राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले चिन्ह वाटप केले.
जळगाव महापालिका निवडणूक : १६ अपक्ष उमेदवारांना मिळाले बॅट चिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:29 IST
जळगाव मनपा निवडणुकीसाठी बुधवारी अपक्ष व इतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये अपक्ष उमेदवारांची सर्वाधिक पसंती बॅट या चिन्हाला दिसून आली. १६ अपक्ष उमेदवारांना ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले तर १३ अपक्ष उमेदवारांना नारळ हे चिन्ह मिळाले.
जळगाव महापालिका निवडणूक : १६ अपक्ष उमेदवारांना मिळाले बॅट चिन्ह
ठळक मुद्देनिवडणूक चिन्हांचे वाटप १३ अपक्षांना नारळ१६ अपक्ष उमेदवारांना ‘बॅट’ हे चिन्ह