शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: जळगाव मनपाचा मोठा निर्णय, विधवा महिलांना मुलींच्या लग्नासाठी मिळणार २१ हजार रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:03 IST

Jalgaon Municipal Corporation Scheme: पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा ओढणाऱ्या विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.

पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा ओढणाऱ्या विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. मुलीच्या लग्नासाठी आर्थिक विवंचनेत असलेल्या मातांना आता पालिकेकडून २१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या इतिहासात ही योजना पहिल्यांदाच राबविली जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ही योजना आखण्यात आली असून, एकूण २३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर हा लाभ दिला जाणार असल्याने, पात्र महिलांनी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे व कधी करायचा?

अंतिम मुदत: २५ फेब्रुवारी २०२६ (कार्यालयीन वेळेत).ठिकाण: महानगरपालिका मजला क्रमांक ६, डे एनयूएलएम विभाग,अर्ज स्वरूप: साध्या कागदावर स्वहस्ताक्षरीत किंवा संगणकीकृत अर्ज स्वीकारले जातील.

पात्रता आणि अटी

१) अर्जदार महिला जळगाव मनपा क्षेत्रात किमान १० वर्षांपासून वास्तव्यास असावी.२) मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.३) आईने पुनर्विवाह केलेला नसावा (तसे प्रतिज्ञापत्र आवश्यक).४) योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा केला जाईल.

आवश्यक कागदपत्रे

वयाचा पुरावा: मुलीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा १०वी/१२वीचे प्रमाणपत्र.निवासाचा पुरावा: जळगाव महापालिका हद्दीत १० वर्षांपासून राहत असल्याचा दाखला.ओळखपत्र: आई व मुलीचे आधारकार्ड.इतर: पतीचा मृत्यू दाखला, पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड, बँक पासबुकचे पहिले पान.विशेष कार्ड: संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड आणि पुनर्विवाह न केल्याचे स्वस्वाक्षांकित प्रतिज्ञापत्र.

"पात्र महिलांनी तातडीने मुदतीत आपले अर्ज मनपाच्या सहाव्या मजल्यावरील विभागात सादर करावेत. जास्तीत जास्त गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा", असे आवाहन जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalgaon Municipal Corporation to provide ₹21,000 aid for daughters' weddings.

Web Summary : Jalgaon Municipal Corporation offers ₹21,000 to widowed mothers for their daughters' weddings. The scheme targets 23 beneficiaries, prioritizing early applicants. Applications are open until February 25, 2026, with specific eligibility criteria related to residency, daughter's age, and non-remarriage of the mother.
टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र