जळगावात खासदार ए.टी. पाटील यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:35 IST2018-04-12T13:35:35+5:302018-04-12T13:35:35+5:30
भाजपाचे पदाधिकारीही सहभागी

जळगावात खासदार ए.टी. पाटील यांचे उपोषण
ठळक मुद्देलाक्षणिक उपोषणलोकसभेत विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळाचा निषेध
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा गुरुवारी १२ एप्रिल रोजी एक दिवसाचे निषेध उपोषण करणार आहेत. त्या अनुषंगाने जळगावचे खासदार ए.टी. पाटील हे जळगाव येथे शिवतीर्थ मैदान येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समवेत आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.