शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

जळगावच्या बाजारपेठेत तीन आठवड्यांपासून धान्य, डाळींमध्ये तेजी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:40 IST

धान्य खरेदीसाठी गर्दी

विजयकुमार सैतवालजळगाव - जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून तेजी सुरूच आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात लोकसभा निवडणुकीमुळे बाजारपेठेवर सरकारचे नियंत्रण नसल्याने भाववाढ होण्यास मदत होत आहे. गव्हामध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. दोन आठवड्यांपासून भाववाढ होणाऱ्या तांदळाचे भाव या आठवड्यात स्थिर राहिल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा मिळाला.कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी असल्याने डाळीवर परिणाम झाला व सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध येण्यासह वायदे बाजाराची चलती असल्याने डाळींचे भाव आणखी वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटलवरून ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. तसेच तूरडाळीचेदेखील भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवरुन ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.गव्हातही तेजीवर्षभरासाठी धान्य खरेदी अद्यापही कायम असून ती १५ जूनपर्यंत अशीच राहणार असल्याने गव्हाला मागणी वाढून तीन आठवड्यापासून गव्हाचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर गव्हाची आवक कमी झाल्याने भाववाढीस मदत होत आहे. २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २२५० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवरून २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू असून तिचे प्रमाण कमी झाले आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या दोन आठवड्यापासून तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव