Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ
By विजय.सैतवाल | Updated: March 17, 2023 16:10 IST2023-03-17T16:08:40+5:302023-03-17T16:10:21+5:30
Jalgaon: गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ
- विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीदेखील आठवडाभरात पाच हजार २०० रुपयांनी वधारून ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी २ फेब्रुवारी रोजी सोने ५९ हजार १५० रुपये प्रति तोळा तर चांदी ७१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र हे भाव कमी-कमी होत गेले. त्यामुळे सोने ५६ ते ५७ हजार दरम्यान राहिले तर चांदी ६४ ते ६६ हजार दरम्यान होती. मात्र गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीत भाववाढ होऊ लागली आहे.
गेल्या आठवड्यात १० मार्च रोजी ५६ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ११ रोजी ९०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर १३ रोजी पुन्हा ३०० रुपयांची वाढ होण्यासह १४ रोजी पुन्हा ९०० रुपयांची वाढ झाली व सोने ५८ हजार १०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ही वाढ कायम राहत १७ मार्च रोजी सोने ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
अशाच प्रकारे १० मार्च रोजी ६२ हजार ३०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात ११ रोजी एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ६३ हजार ७०० रुपयांवर पोहचली. १३ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ६४ हजार २०० रुपयांवर पोहचली. १४ रोजी तर थेट तीन हजार १०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६७ हजार ३०० रुपयांवर पोहचली. ही वाढ कायम राहत १७ रोजी ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
कमोडीटी बाजारात सोने-चांदीची अचानक मागणी वाढल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.