शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगाव : दोन लग्न झाले तरीही तिसरा संसार थाटला; अत्याचार तर केलाच, १९ लाखही लाटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:09 IST

गप्पागोष्टींतून साधली भावनिक जवळीक

जळगाव : दोन लग्न झाले तरीही आपण अविवाहित असल्याचे सांगून श्रीकृष्ण मेंगडे (४०) याने विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न थाटले. नंतर वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तब्बल १९ लाख १० हजार रुपये उकळून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही दोन मुलींसह वास्तव्यास आहे. पतीचे सन २००५ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे महिला ही घरगुती मेस चालवून आणि लेडीज गारमेंटसचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

श्रीकृष्ण मेंगडे हा सन २०१६ मध्ये मेसमध्ये जेवणासाठी येत होता. या काळात त्याने महिलेशी गप्पागोष्टी करून भावनिक जवळीक साधण्यास सुरुवात केली. नंतर त्याने मी अविवाहित असून तू फार आवडते, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, सांगितले. पण, महिलेने नकार दिला. तरीही अत्याचार केले. त्याने महिलेच्या भावनांशी खेळून सर्वांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. सन २०१७ मध्ये त्याने पीडित महिलेशी लग्न केले. नंतर वेळोवेळी महिलेवर शारीरिक अत्याचार केले. 

१९ लाख रुपये उकळले...सन २०१७ ते २०१९ या काळात मेंगडे याने पीडित महिलेकडून वाहनाचे थकीत हप्ते भरण्यासह नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे, व्यापारासाठी पैसे लागत आहे, बाहेरगावी फिरण्यासाठी वेळोवेळी पैसे मागितले. असे एकूण १९ लाख १० हजार रुपये महिलेकडून उकळले. दरम्यान, वारंवार पैसे मागूनही परत न केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर महिलेने न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. अखेर बुधवारी न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीकृष्ण मेंगडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ ४२०, ४९३, ४९५, ४९६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

पाठलाग केला अन् दोन लग्नांचा प्रकार उघड....

  • मेंगडे हा पीडित महिलेसोबत राहत असताना दोन ते तीन दिवस बाहेरगावी जात असल्याचे सांगून घरातून निघून जात होता. त्यामुळे महिलेला त्याच्या वागण्यावर संशय बळावला.
  • ३० मे २०१९ रोजी महिलेने मेंगडे याचा पाठलाग केला. एका घरात जाताना दिसून आला. काही मिनिटांनी पीडित महिलाही त्या घरात आली.
  • तेव्हा तिला दोन महिला दिसल्या. त्यांनी त्यांचे नाव सांगितल्यावर याबाबत पीडितेने मेंगडे याला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
  • मेंगडे याची पूर्वी दोन लग्न झाले असल्याची धक्कादायक माहिती पीडितेला कळाली.
टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी