शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

जळगावात दसऱ्याला ९० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:05 PM

१५०० दुचाकी तर २५० चारचाकींची विक्री

जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला तर कापड बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री होऊन दिवाळीपूर्वीच दसºयाला सुमारे ९० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विविध क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविला.सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साहजळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. पितृपक्षामुळे उलाढाल कमी झाली असताना सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. त्यानंतर नवरात्र व आता विजयादशमीला शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. शहरातील १५०च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. एरव्ही नवरात्रात सुवर्ण बाजारात खरेदी वाढतेच. त्या प्रमाणे यंदाही गेल्या आठवड्यापासून सराफ बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. या दिवसात भाव कितीही असले तरी ग्राहक सोन्याची खरेदी करतातच. ऐन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांचा मोठा उत्साह बाजारात दिसून आला.१० कोटींच्या दुचाकींची विक्रीविजयदशमीचा मुहूर्त साधण्यासाठी नोकरवर्गाकडून दुचाकी व चारचाकीची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आली होती. दुचाकीच्या एकाच दालनातून दसºयाच्या मुहूर्तावर ४४० दुचाकींची विक्री झाली. या सोबतच इतर दालनांमध्ये मिळून साधारणत: १५०० दुचाकींची विक्री झाली. यातून साधारण १० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.२५० चारचाकींची विक्रीदुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत राहिली. चारचाकीच्या एकाच शोरुमध्ये १३४ तर शहरात एकूण २५० चारचाकींची विक्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. यात जवळपास २५ कोटींची उलाढाल झाली.एलईडीला सर्वाधिक मागणीइलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारालादेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कधी नव्हे एवढ्या प्रमाणात एकाच दिवसात ७०० इलेक्टॉनिक्स वस्तूंची विक्री झाली. यात एलईडीला सर्वात जास्त मागणी होती. त्याखालोखाल वॉशिंगमशीन, फ्रीजची विक्री झाली. सकाळपासून ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी सुरू झाली होती, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ५ कोटींच्यावर उलाढाल झाली.कापड बाजारतही उत्साहसण-उत्सव म्हटले म्हणजे प्रत्येक जण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार विजयादशमीलादेखील मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन जवळपास ५ कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.घर खरेदीतही ३५ कोटींची उलाढालविजयादशमीच्या मुहूर्तावर जवळपास १५० जणांनी गृहप्रवेश केला. घर खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात होती. यासाठी कुटुंबासह अनेकजण येऊन शाळा, महाविद्यालय व इतर सोयींचा विचार करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी केली. यातून जवळपास ३५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद राहिला. मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांची दुपारपासून गर्दी वाढली होती.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.यंदा विजयादशमीला चारचाकी खरेदीसाठी मोठी उलाढाल झाली. एकाच दिवसात आमच्या दालनातून १३४ चारचाकींची विक्री झाली.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. आमच्या दालनातून विजयादशमीला एकाच दिवसात ४४० दुचाकींची विक्री झाली.- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

टॅग्स :Jalgaonजळगाव