शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

जळगाव जिल्ह्यात पावसाची पन्नाशीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:48 IST

दमदार पावसाने जिल्हा आबादानी

जळगाव : जिल्हाभरात जामनेरवर यंदा वरूणराजाची कृपादृष्टी असून सततच्या पावसामुळे जामनेरात पावसाच्या टक्केवारीने शतकाकडे वाटचाल केली आहे़ जामनेरात आजपर्यंत ६५ टक्क््यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ दरम्यान, श्रावण महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी दिल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात ४७.४ टक्के पाऊस झाला असून पावसाळ््याच्या दोन महिन्यात पन्नाशीकडे वाटचालीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, पावासाने हळूहळू हजेरी लावत जुलै अखेर पर्यंत हे चिंतेचे ढग दूर केले़ गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २८ टक्के पावसाची नोंद झाली होती, त्यात यंदा १९ टक्क््यांची वाढ होऊन ४७.४ टक्के पाऊस झाला आहे़ जिल्हाभरात जामनेर खालोखाल पाचोऱ्यात ३७० मिमि पाऊस झाला आहे़ सततच्या पावसांमुळे धरणांच्या साठयातही वाढ होत आहे़गिरणा धरणाचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर तर वाघूर धरणात २७ टक्के पाणीसाठा झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून शेतीचे चक्र सुस्थितीत आले आहे़सात तालुक्यात तीनशे पारजिल्हाभरात एरंडोल, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाने तीनशेचा आकडा पार केला आहे़ या सात तालुक्यांमध्ये ३०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर जळगावसह सात तालुक्यांमध्ये २५० ते ३०० मिमिच्या आत पावसाची नोंद झाली आहे़ अमळेनर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे, काही तालुक्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे़ जळगाव शहरात दुपारी झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते़ सर्वत्र पाणी साचले होते़जामनेर तालुक्यात टंचाई दूर, अमळनेरात सर्वात कमीजामनेर तालुक्यात शनिवारी ३६ मिमीच्या अधिक पावसाची नोंद झाली़ आजपर्यंत सर्वाधिक ४७० मिमी पाऊस जामनेरमध्ये झाला आहे़ त्यामुळे जामनेरवरील टंचाईचे ढग दूर होण्यास मदत झाली आहे़ यंदा सर्वाधिक जामनेर तालुक्यात टँकर सुरू होते़ अशा स्थितीत या पावसामुळे दिलासा मिळाला आहे़ दुसरीकडे अमळनेरात २१८ मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़शेतीची कामे रखडली...पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. मात्र सतत सुरु असलेल्या पावसामुळे वाफसा नसल्याने निंदणी करता येत नाही. शनिवारी सकाळी काही वेळ उघडीप होती त्यावेळी शेतांमध्ये निंदणी सुरु झाली. पाऊस सुरु झाल्याने ही कामे आता रखडली आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव