शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा वाळूमाफियांवर भल्या पहाटे ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! बांभोरी परिसरातून ५० ते ६० ट्रॅक्टर-डंपर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:16 IST

दीडशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहाटे संयुक्त धाडसत्र ! पहाटेच झालेल्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये उडाली मोठी खळबळ !

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावासह परिसरात सुरू असलेल्या चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने भल्या पहाटे मोठी कारवाई करत ‘सर्जिकल स्ट्राइक’ केली. पहाटे पाच वाजेपासून सुरू झालेल्या या धाडीत साधारण ५० ते ६० ट्रॅक्टर व डंपर जप्त करण्यात आले.

या कारवाईसाठी सुमारे दीडशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बांभोरी येथे दाखल झाला होता. धरणगाव आणि जळगाव शहरातील सर्व पोलीस स्थानकांतील अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

जप्त करण्यात आलेली वाहने पोलीस मुख्यालयात आणण्यात आली आहेत. विना नंबर तसेच मुदत संपलेल्या वाहनांवर आरटीओमार्फत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहाटेच झालेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवस अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalgaon Police Raid Sand Mafia, Seize Dozens of Vehicles

Web Summary : Jalgaon police conducted a pre-dawn raid targeting illegal sand mining in Bambhori, seizing 50-60 tractors and dumpers. A large police force participated, and vehicles without proper documentation will face RTO action. The operation caused significant disruption among sand mafia.