जळगाव जिल्ह्यात 1 कोटी 28 लाखाचा ऑनलाईन गंडा

By Admin | Updated: April 13, 2017 17:32 IST2017-04-13T17:32:17+5:302017-04-13T17:32:17+5:30

युपीआय अॅपचा गैरवापर. राज्यभरात 12 ठिकाणी ग्राहक व बॅँकांना लावला चुना

In Jalgaon district, online money worth Rs 28.18 crore | जळगाव जिल्ह्यात 1 कोटी 28 लाखाचा ऑनलाईन गंडा

जळगाव जिल्ह्यात 1 कोटी 28 लाखाचा ऑनलाईन गंडा

 जळगाव,दि.12- शहरातील बॅँक ऑफ महाराष्ट्र या नवी पेठ शाखेतून सहा ग्राहकांच्या खात्यातून ‘युपीआय अॅप’ चा गैरवापर करुन 49 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणा:या जितेंद्र मारुती रंधे (रा.चिखली, जि.बुलढाणा) याने जळगाव जिल्ह्यातून 1 कोटी 28 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. पाळधी (ता.धरणगाव) शाखेतून 73 लाख व मुक्ताईनगर शाखेतून 6 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान, रंधे याने राज्यभरात 12 ठिकाणच्या बॅँकातून कोटय़वधी रुपये हडप केले आहेत. पुणे शहरातील विविध बॅँकातून याच पध्दतीने त्याने 6 कोटी रुपये परस्पर खात्यावर वर्ग केले आहेत. या गुन्ह्यात तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

याबाबत पोलीस व बॅँकेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिराजउद्दीन शफिउद्दीन सय्यद (रा.मेहरुण, जळगाव), शेख सलीम शेख मुर्तजा (रा.मेहरुण, जळगाव), शेहनाजबी जाकिर सय्यद (रा.आव्हाणे, ता.जळगाव), मुंताजीन सय्यद (रा.मास्टर कॉलनी, जळगाव), शफीउद्दीन करीमोद्दीन सय्यद (रा.मेहरुण, जळगाव) व रफिक शफियोद्दीन सय्यद (रा.मेहरुण, जळगाव) यांनी जळगाव शहरातील नवी पेठेतील बॅँक ऑफ महाराष्ट्र या बॅँकेत 27 डिसेंबर 2016 ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत खाते उघडले. या ग्राहकांच्या खात्यावर पैसे नसताना युपीआय अॅपचा वापर करुन जितेंद्र मारुती रंधे, अता मोहम्मद खान, राजेंद्र भानुदास बारडे, विजय वसंतराव मुडकुले, गोपाळ गोविंदराव वानखेडे, सुनील केशवराव पंडागळे व राजेश जनार्दन बुडूखले यांच्या वेगवेगळ्या बॅँक खात्यात 48 लाख 94 लाख 582 रुपये परस्पर वर्ग करुन घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅँकेच्या मुख्य व्यवस्थापिका छाया गिरीश भगुरकर (रा.मोहाडी रोड, जळगाव) यांनी बुधवारी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन 13 जणांविरुध्द फसवणूक व आयटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
‘बीट क्वाईन स्कीम’चे आमिष
या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असलेला जितेंद्र रंधे हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. ‘बीट क्वाईन स्कीम’ या योजनेचे आमिष दाखवून अता मोहमद खान (रा.चिखली) या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याने जळगावच्या सहा जणांना शून्य बॅलेन्सने बॅँकेत खाते उघडायला लावले. जळगावचे सहा जण खान याचे जवळचे नातेवाईक आहेत. पैस मिळतील या आमिषाने या सर्वानी बॅँकेत खाते उघडले.

Web Title: In Jalgaon district, online money worth Rs 28.18 crore