जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 13:19 IST2018-11-26T13:19:17+5:302018-11-26T13:19:47+5:30
विविध मागण्या

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जळगाव : विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या आवाहनानुसार जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पत्रकारांचा मोर्चा काढण्यात आला.
पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेन्शन, अधिस्वीकृती पत्रिका देताना जाचक अटी रद्द करणे, मजिठिया आयोगाची अंमलबजावणी करणे, छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व संपेल अशी जाहिरात धोरणाची अंमलबजावणी न करणे, ग्रामीण पत्रकारांना सहज अधिस्वीकृती पत्रिका मिळावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पत्रकार भवन पासून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला व तेथे निवेदन देण्यात येणार आहे.