शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जळगाव जिल्हा रुग्णालयात साडेपाच लाखाचे ‘व्हेंटिलेटर’ धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:43 IST

जळीत कक्षातील निम्म्याहून अधिक ‘एसी’ बंद

ठळक मुद्देसोनोग्राफी बंद‘व्हेंटिलेटर’ बसविले गेलेच नाही

जळगाव : कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणेचा (सेंट्रल आॅक्सिजन) अभाव असलेल्या जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टने कृत्रिम श्वासोश्वास यंत्र (व्हेंटिलेटर) उपलब्ध करून दिल्यानंतर ते बसविण्यातच न आल्याने गेल्या सहा वर्षांपासून ते धुळखात पडून आहे. यंत्र असूनही उपयोग होत नसल्याने नागरिकांना विनाकारण भूर्दंड सहन करावा लागत आहे. या सोबतच सोनोग्राफी मशिन अद्यापही सुरू झाले नसून जळीत कक्षातील निम्म्याहून अधिक वातानुकुलीत यंत्रणा (एसी) बंद आहेत. जिल्हा रुग्णालयातील यंत्र सामुग्रीला लागलेल्या या ‘आजारा’वर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवलेल्या असतात. त्यामुळे त्याचा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे आताही यंत्रसामुग्रीअभावी रुग्णांचे हाल होत आहे.कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा नाहीदररोज जिल्ह्यातील २० ते २२ गर्भवती महिलांची जिल्हा रुग्णालयात प्रसूती होते. त्यांची प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांवर आवश्यक उपचारासाठी नवजात शिशू कक्ष आहे. मात्र या ठिकाणी कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा नसल्याने बालकांना त्याची गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात हलवावे लागते. यामुळे सामान्य जनतेला बऱ्याचवेळा लाखो रुपयांचाही भूर्दंड सहन करावा लागतो. यावर उपाययोजना होणे गरजेचे असले तरी त्याकडे शासनस्तरावरून दुर्लक्ष होत आहे.‘रोटरी वेस्ट’ने दिली साडेबारा लाखाची मशिनरीजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा(सेंट्रल आॅक्सिजन) नसल्याने या ठिकाणी २०१२मध्ये रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टने पुढाकार घेत तत्कालीन अध्यक्ष डॉ. राजेश पाटील. गनी मेमन यांच्यासह पदाधिकाºयांनी साडे बारा लाखाची मशिनरी उपलब्ध करून दिली. रोटरी क्लब आॅफ कल्व्हर सिटी कॅलिफोर्निया (अमेरिका) यांच्या मदतीने रोटरी मॅचिंग ग्रॅण्ड अंतर्गत चार नवजात बालकांची अद्यायावत व्यवस्था होऊ शकेल असे जीवरक्षक यंत्र (वॉर्मर), ह्रदयाचे ठोके मोजण्याचे मशिन, सलाईन देण्याचा पंप, कावीळ कमी करण्याचा लाईट (फोटो थेरपी), नवजात शिशू सेक्शन मशिन (अन्न व श्वास नलिकेच्या स्वच्छतेसाठी) आणि कृत्रिम श्वासोश्वास यंत्र (व्हेंटिलेटर) असे एकूण साडे बारा लाखाची मशिनरी येथे दिली. विशेष म्हणजे यासाठी रोटरीचे अमेरिकेतील पदाधिकारीदेखील उपस्थित होते.‘व्हेंटिलेटर’ बसविले गेलेच नाहीरोटरीने दिलेल्या या मशिनरीतील व्हेंटिलेटरचीच किंमत साडे पाच लाख रुपये आहे. नवजात कक्षात कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा नाही व रोटरीकडून किमान एक यंत्र मिळाले तरीदेखील ते जिल्हा रुग्णालयात बसविले गेले नाही. त्यामुळे काही दिवसांनी ते बसविण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचे काही सुटे भाग (पार्ट) खराब झाल्याने ते मिळू शकले नाही. त्यामुळे हे यंत्र आजही बंद अवस्थेतच आहे.नागरिकांना भूर्दंडव्हेंटिलेटरअभावी या ठिकाणी जन्मलेल्या बालकांना गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे नागरिकांना भूर्दंड सहन करावा लागतो. अशाच प्रकारे दोन आठवड्यापूर्वी एका नवजात बालकास खाजगी रुग्णालयात हलविले असता दोन लाखाचा खर्च आला होता. आर्थिक झळ बसण्यासह बºयाचवेळा आॅक्सिजन अभावी नवजात बालकांच्या जीवावरदेखील बेतते.जळीत कक्षात गैरसोयजळीत कक्षातही रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणच्या १० पैकी सात एसी बंद असल्याने येथे जळीत रुग्ण आणल्यानंतर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ््यामध्ये तर रुग्णांना अधिक गैरसोयीच्या झळा बसतात.सोनोग्राफी बंदजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांची आर्थिक स्थिती बिकट असते. त्यात आता सोनोग्राफी होत नसल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. वेळेवर सोनोग्राफी झाले नाही तर गंभीर प्रसंग ओढावू शकतो, अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.प्रसूती कक्षामध्येदेखील वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे अडचणी येतात. त्यामुळे ‘सिझर’साठी त्यांना औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागते. त्यामुळे पुरेस्या स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.तांत्रिक बिघाडामुळे सोनोग्राफी मशिन बंद आहे. या बाबत तंत्रज्ञास कळविले आहे.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता.नवजात शिशू कक्षात मिळालेले व्हेंटिलेटर हे त्या वेळी बसविले गेले नाही. मी आल्यानंतर बसविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे काही पार्ट मिळत नव्हते. आता ते आॅक्सिजनच्या नॉर्मल सिलिंडरवर चालविले तर ते चालू शकणार नाही.- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव