शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले, वकील लावा पण ‘एजंट’ नको; शेतकऱ्यांना केले आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 18:50 IST

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती.

कुंदन पाटील 

जळगाव : महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वीच संपूर्ण प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे २२०० प्रकरणांना २१ दिवसांनी सुनावणी घेऊ, असे सांगत दालनाबाहेर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सामोरे गेले. गतकाळात काय झाले, याची जाणीव आहे. मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिेजे. दलालांना नको. म्हणून बाजू मांडण्यासाठी वकील लावा पण ‘एजंट’ नको, अशा सूचक शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती. जिल्ह्यातील २२०० प्रकरणांवर सुनावणी होणार असताना शेतकऱ्यांच्यावतीने वकिलांनी बाजू मांडली.न्यायालयीन निवाड्यानुसार सुनावणी सुरु ठेवावी, अशी विनंती वकिलांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सुनावणी घेण्यास नकार दिला. प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर होत नाही तोपर्यंत सुनावणीत वेळ खर्ची करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. त्यावर वकिलांनी वेळ मागितली. १५ दिवसात प्रतिज्ञापत्र व दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर वकिलांनी हा कालावधी अपूर्ण पडेल म्हणत सुनावणीचा कालावधी वाढवून मिळावी, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसानंतर सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही....जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दालनाबाहेर पडले. तेव्हा त्यांना व्हरांड्यात शेतकऱ्यांची गर्दी दिसली. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ‘दलाली’चे कान पिळण्यासाठी त्यांनी रोखठोक सल्लाच देऊन टाकला. ‘गतकाळात काय झाले आहे, हे मला माहिती आहे. शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळत नाही. मात्र ‘एजंट’ वेळ मारुन नेतात. म्हणून सुनावणीदरम्यान, वकील लावा पण ‘एजंट’ लावू नका, अशा शब्दात सूचक इशारा दिला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांविषयी अडचणी येत असल्याची तक्रार मांडली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वकील लावता येत नसेल माझ्याकडे या. मी सहकाऱ्यांकरवी तुमचे कागदपत्र तयार करुन देतो.दस्ताऐवजातील पूर्तताही करुन देतो.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाला मी कागदपत्रे पुरवायला तयार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुठले कागदपत्र दिले, तेही देतो. संपूर्ण पारदर्शकताही जपायला तयार आहे. मात्र मला कुणाचा फोन आणू नका. जेव्हा मोबदल्याचा पूर्ण असलेला दस्ताऐवज सादर केला की अंतिम सुनावणी घेईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करेल, अशा शब्दही त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी