जळगाव : मास्टर कॉलनीतील संतोषी माता चौकात दहशत माजविणाºया यासीनखान मासुमखान मुलतानी (४८, रा.गणेशपुरी, मास्टर कॉलनी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी दुपारी चार वाजता अटक केली. यासीन हा २ जानेवारी २०१९ पासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार आहे. हद्दपार असतानाही तो शहरात वावरत होता.यासीन मुलतानी दहशत माजवित असून त्याच्या धाकामुळे व्यावसायिक दुकाने बंद करीत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने एमआयडीसी पोलिसांना रविवारी दुपारी कळविली. ठाणे अमलदार दिनकर खैरनार यांनी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना घटनेची माहिती देऊन तातडीने गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, निलेश पाटील व गोविंदा विश्राम पाटील यांना घटनास्थळावर रवाना केले. यासीन हा साडे चार वाजता संतोषी माता चौकात आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन यासीन मुलतानीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रांताधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या आरोपीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:24 IST
मास्टर कॉलनीतील संतोषी माता चौकात दहशत माजविणाºया यासीनखान मासुमखान मुलतानी (४८, रा.गणेशपुरी, मास्टर कॉलनी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी दुपारी चार वाजता अटक केली. यासीन हा २ जानेवारी २०१९ पासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार आहे. हद्दपार असतानाही तो शहरात वावरत होता.
जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या आरोपीला पकडले
ठळक मुद्दे मास्टर कॉलनीत माजवित होता दहशतएमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल