जळगाव : विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
By सागर दुबे | Updated: April 19, 2023 16:56 IST2023-04-19T16:55:52+5:302023-04-19T16:56:33+5:30
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील कल्पना भरत धाडी (३५) या महिलेने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होता. मंगळवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कल्पना धाडी ही महिला लोणवाडी येथे कुटुंबासह वास्तव्यास होती. पाच ते सहा दिवसांपूर्वी घरात कुणी नसताना महिलेने विष प्राशन केले होते. त्यामुळे प्रकृती बिघडली होती. हा प्रकार पतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पत्नीला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मंगळवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.