चाकूहल्ल्यातील तरुणीचा उपचारादरम्यान जळगावात मृत्य, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 13:00 IST2017-10-24T12:59:42+5:302017-10-24T13:00:23+5:30

पोलीस अधिका:यांनी दिली घटनास्थळी भेट

Jalgaon dead during the treatment of a skeleton woman | चाकूहल्ल्यातील तरुणीचा उपचारादरम्यान जळगावात मृत्य, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चाकूहल्ल्यातील तरुणीचा उपचारादरम्यान जळगावात मृत्य, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमत

फैजपूर, जि. जळगाव, दि. 24 -  सोमवारी संध्याकाळी चाकू हल्ल्यातील जखमी झालेल्या नेहा टोपणो (21, रा. साकरी फाटा) या तरुणीचा मध्यरात्री खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नास नकार दिल्याने यावल तालुक्यातील पिळोदा फाटा येथे सोमवारी संध्याकाळी नेहा टोपणो या तरुणीवर अँथोनी फर्नांडीस उर्फ टोनी (25, रा. तापीनगर, भुसावळ) या तरुणाने चाकू हल्ला केला होता. त्यानंतर जखमी अवस्थेच तरुणीला  जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास या तरुणीचा मृत्यू झाला. 
या प्रकरणी मंगळवारी अँथोनी फर्नांडीस याच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिका:यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: Jalgaon dead during the treatment of a skeleton woman