शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

केंद्रीय स्वच्छता समितीकडून जळगाव शहराच्या तपासणीला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:19 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. दोन दिवस समितीकडून दस्तऐवजांची पाहणी केली जाणार असून, बुधवारपासून शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोबाईलव्दारे पाठविला जातोय केंद्राकडे अहवाल दोन दिवसानंतर शहरात होणार प्रत्यक्ष पाहणीप्रत्यक्ष पाहणीसाठी स्वतंत्र समिती

आॅनलाईन लोकमत

जळगाव-स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. दोन दिवस समितीकडून दस्तऐवजांची पाहणी केली जाणार असून, बुधवारपासून शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय समितीचे दोन सदस्य सोमवारी शहरात दाखल झाले. यामध्ये निखील पाटील व राहुल पाटील यांचा समावेश आहे. सोमवारी मनपाच्या आरोग्य विभागात दोन्ही सदस्यांनी स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची तपासणी केली. तसेच या दस्तएवेजांमध्ये जे काही दोष, चांगल्या बाबी या समितीच्या सदस्यांकडून  मोबाईल अ‍ॅपद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत असल्याची माहीती समिती सदस्यांनी दिली आहे.

सकाळी समिती दाखल

केंद्र्र शासनाची समिती सकाळी ९.३० वाजताच महापालिकेत दाखल झाली. सकाळपासून निखिल पाटील यांनी महापालिकेच्या स्वच्छता,  ओला सुका कचरा, घंटा गाड्या, कचरा कुंड्याची संख्या व इतर माहीती घेतली. तसेच स्वच्छता संदभार्तील कामांच्या दस्तऐवजांची तपासणी सुरु केली होती. विशेष म्हणजे  संबधित दस्तऐवज केंद्र शासनाच्या हौसिंग व अर्बन या विभागाकडे मोबाइलच्या अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवत होते. त्यामुळे प्रत्यक्षात केंद्र शासनातील अधिकारी देखिल दिल्लीत बसून या कागदपत्रांची तपासणी करीत होते. चारशे नागरिकांचा घेणार अभिप्रायसमितीकडून सोमवार व मंगळववारी कागदपत्रांची तपासणी झाल्यानतंर बुधवार व गुरुवारी समितीककडून शहरातील प्रत्येक प्रभागात फिरुन प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीचे फाटो देखिल लोकेशनसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. समितीतील सदस्य पाहणी करुन त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार आहे. तसेच शहरातील विविध भागांमधील चारशे नागरिकांचा अभिप्राय समितीकडून घेतला जाणार असून, नागरिकांना सहा प्रश्नांची प्रश्नावली दिली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीसाठी स्वतंत्र समितीकागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर सोमवारी दाखल झालेल्या समितीतील काही सदस्य परत जाणार असून, इतर सदस्य बुधवारी शहरात दाखल होती. नागरिकांच्या प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी स्वतंत्र समिती येणार आहे. ही समिती शहरातील प्रत्यक प्रभागात जावून पाहणी करतील. या समितीत तीन ते चार सदस्य राहणार आहेत. तीन ते चार दिवस समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांनी स्वच्छतेसाठी ४ हजार गुणांचे निकष तयार केले आहेत. यामध्ये कागदपत्र पुर्ततेसाठी १४०० गुण, नागरिकांचा अभिप्राय १४०० गुण आणि प्रत्यक्ष पाहणी १२०० गुणांची राहिल.