शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जळगावातून चंद्रपूरला जाणारी बनावट दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:05 IST

राज्य उत्पादन शुल्कची रेल्वे स्टेशनवर कारवाई

ठळक मुद्देनवजीवन एक्सप्रेसमधून रवाना होणार होती दारुमुख्य सूत्रधार वेगळेच

जळगाव : नवजीवन एक्सप्रेसमधून जळगावहून चंद्रपूरला नेण्यात येणारा लाखो रुपयाचा बनावट देशी, विदेशी दारुचा साठा गुरुवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर पकडला. यावेळी राहूल सावन बागडे (वय २९, रा. नाथवाडा, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई करताना रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेण्यात आली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्टेशनवरुन नवजीवन एक्सप्रेसमधून चंद्रपूर व बल्लाळशा येथे बनावट देशी व विदेशी दारुचा साठा जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुरनाड चेकपोस्टचे कॉन्स्टेबल अजय गावंडे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच ही माहिती अधीक्षक एस.एल.आढाव यांना दिली. गावंडे भुसावळ येथून थेट रेल्वे स्टेशनला पोहचले तर जळगाव येथून आढाव यांचे पथकही साध्या गणवेशात पोहचले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्र पाल यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. संशयावरुन बॅगांची तपासणी करीत असतानाच एका बॅगेत व गोणपाटात देशी दारुचा साठा आढळला. एकापाठोपाठ अशा दहा ते पंधरा बॅगा दारुने भरलेल्या आढळून आल्या.अमळनेर येथेही पकडली दारुअमळनेर येथे हॉटेल चिन्मय सर्व गार्डन येथे एका कारमध्ये (क्र. एम.एच.१९ क्यु.०१४०) या कारमध्ये दहा हजार रुपये किमतीची विदेशी दारु पकडण्यात आली. कारसह ३८ हजार ३३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्यामकांत देविदास बागुल याला अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व्ही.एम.माळी व एम.बी. सोनार यांनी ही कारवाई केली.या पथकाने केली कारवाईराज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक एस. एल.आढाव, निरीक्षक एन.बी. दहिवडे, दुय्यम निरीक्षक एम.बी.सोनार, जे.एस.मानमोडे, कॉन्स्टेबल अजय गावंडे, एस.एस.निकम, सागर देशमुख, रघुनाथ सोनवणे, डी.बी.पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्र पाल, उपनिरीक्षक ओ.पी.कुलदीप सहायक उपनिरीक्षक वाय.के.शर्मा, आर.एन. पाटील, प्रमोद सांगळे व विक्रम वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली....तर कारवाई टळली असतीनवजीवन एक्सप्रेसची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ सायंकाळी ४.५५ ची आहे. ४.४५ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक रेल्वे स्टेशनवर पोहचले. विशेष म्हणजे गुरुवारी ही गाडी निर्धारित वेळेवर होती. दहा मिनिटे पथक उशिरा पोहचले असते तर कदाचित हा दारुचा साठा या एक्सप्रेसमधून रवाना झाला असता व कारवाई टळली असती.मुख्य सूत्रधार वेगळेच..या दारुच्या साठ्याजवळून पळून जाण्याची तयारी करीत असताना राहूल बागडे याला पथकाने पकडले. त्याची जागेवरच चौकशी केली असता हा दारुचा साठा चंद्रपुर व बल्लाळशा येथे जात असल्याचे त्याने सांगितले. मी फक्त रोंजदारीने नेणारा आहे, मुख्य सूत्रधार दुसरेच असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याला अटक केलेली आहे. प्राथमिक चौकशीत ही दारु बनावट आढळून आली असून ती कोठून आणली व कोणी आणली याची चौकशी केली जात आहे. रेल्वे स्टेशनवर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत लोहमार्ग पोलिसांना विचारले असता आमच्यापर्यंत कोणतीच माहिती अद्याप आलेली नसल्याचे उत्तर चौकीतील कर्मचाºयांनी दिले.प्राथमिक तपासणीत ही दारु बनावट दिसून येत आहे. तरीही मुंबई व नाशिक येथील प्रयोगशाळेत दारुचे नमुने पाठविले जातील. ही दारु कुठे तयार झाली. त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी केली जात आहे.-एस.एल.आढाव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव