शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव: १० नगरसेवक आणणाऱ्यास महापौरपदाची उमेदवारी, सत्ता राखण्यासाठी भाजपची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:16 IST

सोमवारी १० नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे.

जळगाव: महापालिकेतील २७ नगरसेवक फुटल्याने अल्पमतात आलेल्या भाजपकडे ३० नगरसेवक असून, त्यातील काही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे बहुमताचा ३८ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला ८ नगरसेवक हवे आहेत. खबरदारी म्हणून १० नगरसेवक आणणाऱ्या उमेदवाराचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले जाणार असल्याचे समजते. गुरुवारी निवडणूक होणार आहे.सोमवारी १० नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेकडून जयश्री महाजन व कुुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी भाजपकडून महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मयुर कापसे व सुरेश सोनवणे यांनी अर्ज केले. गिरीश महाजन यांनी ही चार नावे दिली. सोमवारी भाजपच्या ९ नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला होता. 

नगरसेविका गायब, पतीची पोलिसात तक्रारभाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्यासोबत नाशिकला जात असल्याचे ज्योती चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र नाशिकला गेल्यानंतर त्यांचा संपर्क झालेला नसल्याचे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. पत्नीचा शोध घेऊनही ती न मिळाल्याने चव्हाण यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दिली. 

निवडणूक ‘ऑनलाइन’ औरंगाबाद : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेला कुठलीही स्थगिती दिली नाही. परिणामी गुरुवारी होणारी महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. या निवडणुकीत सभागृहात प्रत्यक्ष मतदान घेण्याची मागणी केली होती.  

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाElectionनिवडणूकMayorमहापौर