जळगाव ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नेरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:55 IST2017-12-09T17:51:00+5:302017-12-09T17:55:04+5:30
बिनविरोध निवड: उपाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांना संधी

जळगाव ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नेरकर
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.९ - जिल्हा सरकारी कर्मचारी पतपेढीच्या (ग. स. सोसायटी) अध्यक्षपदी विलास यादवराव नेरकर तर उपाध्यक्षपदी कैलास पंढरीनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. नेरकर हे यापूर्वीही अध्यक्ष होते. त्यांना आता पुन्हा संधी मिळाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर शिक्षकांचीच वर्णी लागली आहे.
ही निवडणूक शनिवारी सकाळी ११.३० वाजता झाली. दोघांचेच अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध जाहीर करण्यात आले. या सोसायटीवर सहकार गटाचेचे सर्व संचालक निवडून आलेले असल्याने एकहाती सत्ता आहे. सहकार गटाचे नेते बी. बी. पाटील व इतर वरिष्ठांनी या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केले. नावे जाहीर होताच फटक्यांची आतषबाजी करीत समर्थनकांनी आनंद व्यक्त केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.ए. शेळके यांनी काम पाहिले. निवडीनंतर दोघा पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले व उपाध्यक्ष महेश पाटील, गटनेते उदय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक अजबसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.झेड.पाटील, शांताराम पाटील, सुमन पाटील, भाऊसाहेब महाले, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल पाटील, रागिणी चव्हाण, विद्यादेवी पाटील, सुभाष देशमुख, मनोज पाटील आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.