Jalgaon: दरवाजा उघडताच दिसला बहिणीचा मृतदेह, जळगावात महिलेनं संपवलं जीवन
By विजय.सैतवाल | Updated: October 18, 2023 17:27 IST2023-10-18T17:26:10+5:302023-10-18T17:27:04+5:30
Jalgaon News: एकट्या राहत असलेल्या सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण आली त्या वेळी ही घटना उघडकीस आली.

Jalgaon: दरवाजा उघडताच दिसला बहिणीचा मृतदेह, जळगावात महिलेनं संपवलं जीवन
- विजयकुमार सैतवाल
जळगाव : एकट्या राहत असलेल्या सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण आली त्या वेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मजुरी काम करणाऱ्या सपना भोई या हरिविठ्ठल नगर परिसरात एकट्याच राहत होत्या. त्यांनी मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या मागील गल्लीत राहणारी त्यांची बहिण मंगलाबाई ढोले या सपनाच्या घरी आल्या. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा ढलताच त्यांना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.