जळगाव व धरणगाव तालुक्यात २४ पैकी १६ ग्रा.पं. वर शिवसेनेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:21 IST2017-12-27T19:09:07+5:302017-12-27T19:21:40+5:30
जळगाव ग्रामीण मतदार संघातील २४ ग्रा पं च्या मतमोजणीत शिवसेनेने तबल १६ ठिकाणी विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

जळगाव व धरणगाव तालुक्यात २४ पैकी १६ ग्रा.पं. वर शिवसेनेचा दावा
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२७ : जळगाव ग्रामीण मतदार संघातील २४ ग्रा पं च्या मतमोजणीत शिवसेनेने तबल १६ ठिकाणी विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनाच आपल्या पाठीशी राहू शकते हा मतदारांनी शिवसेनेवर जो विश्वास टाकला त्याचा हा विजय असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जळगाव तालुक्यात ११ पैकी ८ ठिकाणी भगवा !
जळगाव तालुक्यातील ११ ग्राम पंचायतीची निवडणुक जाहीर झाली होती पैकी ग्रामपंचायत पळसोद बिनविरोध झाली होती. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात ११ पैकी ८ ग्रा.पं. वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. निमगाव-बेडी, खेडी,पाथरी, डोमगाव, विटनेर, धामणगाव, सुभाषवाडी व पळसोद या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर २ ठिकाणी भाजपा व १ ग्रा.पं. राष्ट्रवादी च्या ताब्यात आली आहे. तालुक्यात एकूण ९१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ६८ ग्रा.पं.सदस्य शिवसेनेचे विजयी झाल्याचा दावा केला आहे.
धरणगाव तालुक्यात १३ पैकी ८ ग्रा.पं.शिवसेनेकडे
तालुक्यातील १३ ग्रामपंचायती पैकी २ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १३ पैकी भोद, फुलंपाट, निमखेडा, झुरखेडा, बाभूळगाव, तरडे, खामखेडा व टहाकळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय प्राप्त केला आहे. उर्वरित ५ ग्रा.पं. पैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी तर २ ठिकाणी भाजपा चा विजय झाला आहे. तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायत सदस्या पैकी ५७ सदस्य शिवसेनेचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजीव पाटील, जळगाव तालुका प्रमुख नाना सोनवणे, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, सलीम पटेल, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पप्पू सोनवणे यांनी सत्कार करीत अभिनंदन केले आहे.