शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जळगाव : विहीर खोदताना मिळाली होती उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती

By अमित महाबळ | Updated: September 6, 2022 16:59 IST

सुमारे ५७ वर्षांपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेर असलेल्या एका शेतात विहिरीसाठी खोदकाम चालू असताना अचानक गणपतीची मूर्ती मिळाली

जळगाव : सुमारे ५७ वर्षांपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेर असलेल्या एका शेतात विहिरीसाठी खोदकाम चालू असताना अचानक गणपतीची मूर्ती मिळाली, तीही उजव्या सोंडेची होती. शेतमालकाने मोठ्या आनंदाने त्याच जागेवर चौथरा बांधून त्यावर बाप्पाची प्रतिष्ठापना केली. कालांतराने त्यांनी शेत विकले. तेथे रहिवासी भाग तयार झाला. मात्र, मंदिर होते तसेच राहिले. बाप्पाच्या सान्निध्यातील म्हणून त्याला ‘गणपती नगर’ हे नाव मिळाले.

शिरसोली नाक्याच्या अलीकडे गणपती नगरच्या मुख्य रस्त्यावर लाल रंगातील एक छोटे मंदिर आहे. तेच हे उजव्या सोंडेचे गणपती मंदिर. जयवंत मुळे यांनी मंदिराची माहिती दिली. त्यांचे पणजोबा गणपतराव मुळे हे वनखात्यात नोकरीला होते. त्यांचे जळगाव शहराच्या बाहेर मोठे शेत होते. शेताच्या एका बाजूला एसपी बंगल्यामागील स्टेट बँक कॉलनी आणि दुसरीकडे फटाका फॅक्टरी होती. या दोन्हींच्या मधल्या जागेत आताच्या हायवेपर्यंत विस्तीर्ण शेत होते. १९६५च्या सुमारास वडील संभाजी मुळे हे विहिरीसाठी शेतात खोदकाम करत असताना त्यांना गणपतीची मूर्ती मिळाली. तीही उजव्या सोंडेची होती. ज्या जागेवर मूर्ती मिळाली तेथेच त्यांनी १९६६ मध्ये चौथरा बांधून गणेश जयंतीच्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

गणेश जयंतीला मोठा कार्यक्रमशेतात मूर्ती सापडली तेव्हा तिच्यावर शेंदूर लावलेला होता. नंतरही शेंदूरच लावला जात होता. काही वर्षांनी मूर्तीला रंग देण्यात आला. या ठिकाणी केलेला नवसा पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी गणेश जयंतीला मोठा कार्यक्रम होतो. मंदिर स्थापन झाल्यावर प्रारंभीच्या दिवसांत कुलकर्णी, त्यांच्या नंतर दत्तात्रय देशपांडे यांनी २० वर्षे सेवा केली. आता सुधीर मांडे हे व्यवस्था पाहतात. सकाळी सव्वापाच वाजता मंदिर उघडते. सायंकाळी पाच ते रात्री ८.३० वाजेपर्यंत खुले असते.

टॅग्स :Jalgaonजळगावganpatiगणपती