शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Jalgaon: पत्नीपाठोपाठ पतीचेही अडीच तासातच निधन! सहजीवनाचा प्रवास परलोकीही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 19:33 IST

Jalgaon News: ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला.

- कुंदन पाटीलजळगाव - ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला तेव्हा ‘पाटील’गृही ममत्व-पितृत्व हरपल्याने दु:खाचा डोंगर कोसळला.

मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीत ८६ वर्षीय शालिग्राम दामू पाटील (विसपुते नेरीकर) यांचे कुटूंब वास्तव्यास. शालिग्राम पाटील यांनी मायमाती पूजण्यातच आयुष्य घालविले. शेतीशी एकनिष्ठ असणाऱ्या पाटील यांचा मुलगा किशोर तिकडे सराफी व्यवसायात पाय रोवत गेला. पाच लेकींचा विवाहानंतर संसार गुण्यागोविंदानं सुरु असतानाच या रावळासाठी ‘बुध’वार ‘घात’वार ठरला. सकाळी साडे अकरा वाजता प्रमिलाबाई शालीग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सहचारिणी म्हणून सोबतीने आयुष्य पूजणाऱ्या आणि जगणाऱ्या शालिग्राम पाटील यांना धक्काच बसला. प्रमिलाबाईंचं एकटं जाणं त्यांच्या मनाला खुपत गेलं. मुलगा किशोर, सून, नातवंडांसह पाचही लेकी माय हरपली म्हणून दु:खात बुडाले. तिकडे शालिग्राम पाटील दु:ख पचवत बसले. ते दु:खही होतेच असह्य करणारं.सात जन्माची गाठ बांधणाऱ्या प्रमिलाबाईंविना आयुष्य एकाकी आहे, याची  जाणीव होत गेली आणि दुपारी २ वाजता त्यांना ह्दयविकाराने हेरले. प्रमिलाबाईंसोबत प्रवास करण्यासाठी. त्यांचेही निधन झाले. एकानंतर दुसरी वेदनादायी घटना घरात घडली म्हणून मातृ-पितृछत्र हरपलेल्या या घराला अश्रूंनी चिंब केले. शेजारीही या दोघांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करीत गेले.

आज होणार दोघांवर अत्यंसंस्कारनातलग जमले. लेकींसह जावईदेखिल. नातवंडे होतेच सोबतीला. दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता मेहरूण स्मशानभूमीत अखेरचा निरोप द्यायचे ठरले. 

टॅग्स :JalgaonजळगावFamilyपरिवार