जळगाव : वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून तरुण ठार
By संजय पाटील | Updated: March 16, 2023 09:52 IST2023-03-16T09:52:26+5:302023-03-16T09:52:42+5:30
अमळनेरनजीक बुधवारी रात्री ही घटना घडली.

जळगाव : वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून तरुण ठार
जळगाव : जोरदार वादळामुळे झाडाची फांदी अंगावर कोसळून अभियंता तरुण जागीच ठार झाला. ही घटना निंभोरा ता. अमळनेरनजीक बुधवारी रात्री आठ वाजता घडली.
बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास निंभोरा येथील संजय सागर धनगर (३५) हा मोटारसायकलने घराकडे निघाला होता. वादळामुळे रस्त्यात निबांची झाडाची फांदी अंगावर पडली. यात तो जागीच ठार झाला.