Jalgaon: बनावट बिले वाटप करुन १२ कोटीचा जीएसटी बुडविला, संशयिताला अटक
By सुनील पाटील | Updated: August 1, 2024 17:42 IST2024-08-01T17:42:00+5:302024-08-01T17:42:34+5:30
Jalgaon News: सिमेंटची डिलरशीप दाखवून ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले वाटप करुन १२ कोटी ६५ लाख रुपयांचा जीएसटी बुडविणाऱ्या नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) या ठगास जीएसटी विभागाने गुरुवारी अटक केली.

Jalgaon: बनावट बिले वाटप करुन १२ कोटीचा जीएसटी बुडविला, संशयिताला अटक
- सुनील पाटील
जळगाव - सिमेंटची डिलरशीप दाखवून ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले वाटप करुन १२ कोटी ६५ लाख रुपयांचा जीएसटी बुडविणाऱ्या नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) या ठगास जीएसटी विभागाने गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावताना जीएसटी विभागाला दोन दिवस चौकशीची मुभा दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव धनगर याने स्वामी ट्रेडींग कंपनी नावाची फर्म दाखवून त्याद्वारे ९० ग्राहकांना ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले अदा केली. प्रत्यक्षात धनगर याचे कोणतेही दुकान किंवा डिलरशीप नाही. फक्त कागदावर कंपनी दाखवून शासनाच्या कराची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाचे उपायुक्त सूर्यकांत कुमावत, सहायक आयुक्त आर.टी.पाटील व मेहुल गिरानी यांनी छापा टाकून धनगर याला अटक केली. त्याच्याविरुध्द महाराष्ट्र जीसएटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धनगर याला दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. याच वेळी जीएसटी विभागाला धनगर याची चौकशी करण्यासाठी दोन दिवसाची मुभा दिली. जीएसटी विभागाच्यावतीने ॲड.कुणाल पवार तर सरकारकडून सुरळकर यांनी काम पाहिले.