हिंगोणा, ता. यावल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मोर धोरण हे सप्टेंबर महिन्यामध्ये भरले व ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, भानुदास चोपडे, शरद महाजन, आप्पा चौधरी, किशोर सुनील फिरके, भगतसिंग पाटील, फैजपूर येथील नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शेखर चौधरी, नरेंद्र वानखेडे, जी. पी. पाटील, मारूळ सरपंच असद अहमद, बोरखेडा सरपंच पिंटू तळेले, सांगवी उपसरपंच विकास धाडे, युवराज भगाळे, उल्हास चौधरी, राजेंद्र राणे, माजी सरपंच महेश राणे, किशोर फालक, भूषण राणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मोर धरणाचे जलपूजन करताना शिरीष चौधरी
सुजाता तडवी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
फैजपूर : यावल येथील रहिवासी सुजाता फिरोज तडवी यांना मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सेवा देणाऱ्या एकूण ५० शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी यावर्षी एकूण १३० शिक्षकांची मुलाखत घेण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. न. पा. उच्च प्राथमिक इंग्रजी शाळा, वरळी येथे तडवी या शिक्षिका आहेत. त्या फैजपूर येथून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक फकिरा तडवी यांच्या कन्या आहेत.