जैन साध्वीजींचा चातुमार्सिक मंगलमय प्रवेश उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:35+5:302021-07-02T04:12:35+5:30
शिरसाळे येथून पायी वारीने अमळनेर न. पा. हद्दीत साध्वीजी सुधर्मनिधीश्रीजी, अक्षयनिधीश्रीजी, पुनितनिधीश्रीजी, लक्षज्ञनिधीश्रीजी, विश्वज्ञनिधीश्रीजी, तात्त्विकनिधीश्रीजी अशा सहा साध्वीजींचा प्रवेश ...

जैन साध्वीजींचा चातुमार्सिक मंगलमय प्रवेश उत्साहात
शिरसाळे येथून पायी वारीने अमळनेर न. पा. हद्दीत साध्वीजी सुधर्मनिधीश्रीजी, अक्षयनिधीश्रीजी, पुनितनिधीश्रीजी, लक्षज्ञनिधीश्रीजी, विश्वज्ञनिधीश्रीजी, तात्त्विकनिधीश्रीजी अशा सहा साध्वीजींचा प्रवेश होताच समस्त जैन बंधू-भगिनींनी मंगलमय जयघोषात साध्वीजींचे जोरदार स्वागत केले. ढेकू रोडवरील लामा जीनपासून मंगल कलशधारी जैन सुहासिनींनी जागोजागी पूजाअर्चा करत न्यू प्लाॅट शीतलनाथ जैन मंदिरात सकाळी सात वाजता साध्वीजींचा चातुमार्सिक प्रवेश झाला. मंदिर परिसर सडा-रांगोळ्या, विद्युत रोषणाईने सजविण्यात आला.
कोरोना नियमावलीच्या पालनाने, सामाजिक अंतर राखत साध्वीजींच्या मांगलिक प्रवचनाचा भाविकांनी लाभ घेतला. चार महिन्यांचा साध्वीजींचा चातुर्मास निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी सामूहिक आयंबीलचे आयोजन करण्यात आले. मनीष छाजेड राजनांदगाव, सतीश सेठीया बेटावद, ज्ञानेश्वर धनगर यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रा. अरुण कोचर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी महेंद्रलाल कोठारी, प्रफुल्ल सिंघवी, सुनील छाजेड, राजेंद्र सेठिया, बिपीन कोठारी, प्रकाश शहा, अरुण जैन, विकास कोठारी, प्रदीप शाह, प्रवीण शाह व जैन समाजबांधव उपस्थित होते.
010721\01jal_5_01072021_12.jpg
जैन साध्वीजींचा चातुमार्सिक मंगलमय प्रवेश उत्साहात