जानवे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांकडून भांडे स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 20:47 IST2017-07-26T17:39:28+5:302017-07-26T20:47:29+5:30
सोशल मिडीयावर व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पं.स.सदस्य, केंद्रप्रमुखांनी पाहणी करीत शिक्षकांची कानउघडणी केली.

जानवे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांकडून भांडे स्वच्छता
ऑनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव, दि.26 - तालुक्यातील जानवे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्याथ्र्याकडून भांडी घासली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची दखल घेत, पंचायत समिती सदस्या रेखाबाई पाटील यांनी शिक्षकांची कान उघाडणी करीत शेरेबुकात नोंद केली.
जानवे येथे प्राथमिक शाळेत विद्याथ्र्याकडून जेवणाची भांडी घासली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पंचायत समिती सदस्या रेखाताई पाटील, नाटेश्वर पाटील व केंद्र प्रमुख शरद सोनवणे शाळेत पोहचले. याबाबत त्यांनी शिक्षकांना जाब विचारला. स्वयंपाक करणा:या महिलेने आपल्या हितसंबंधित लहान मुलांना भांडी घासायला लावल्याचा खुलासा शिक्षकांनी केला आहे. तसेच दोन शिक्षक शाळेत उशिरा आल्याचेही स्पष्ट झाले. पदाधिकारी व केंद्र प्रमुखांनी शिक्षकांची कानउघडणी करीत शेरेबुकात नोंद केली आहे.