तिसऱ्या लाटेबाबत आताच सांगणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:06+5:302021-07-02T04:13:06+5:30
जळगाव : इंग्लड, आफ्रिकेत तिसरी लाट आली आहे. गेले काही अनुभव बघता आपल्याकडे लाट येण्याची शक्यता अधिक आहे, ...

तिसऱ्या लाटेबाबत आताच सांगणे कठीण
जळगाव : इंग्लड, आफ्रिकेत तिसरी लाट आली आहे. गेले काही अनुभव बघता आपल्याकडे लाट येण्याची शक्यता अधिक आहे, मात्र, याबाबत आताच काही भाष्य करता येणार नाही, असे औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या डॉ. योगिता बाविस्कर यांनी सांगितले. दोन महिन्यात लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी ती सुरू झाल्यानंतरच समजेल, असेही त्या म्हणाल्या. जीएमसीतील डॉक्टरांनी
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित गुरुवार, १ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि महाविद्यालयातील डॉक्टरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मालकर व डॉ. संगीता गावीत, प्र.प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. संदीप पटेल, डॉ. विजय गायकवाड, डॉ. किशोर इंगोले, डॉ. योगीता बावस्कर, डॉ.संजय बनसोडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेल्या उपाययोजना व पुढील नियोजनबाबात अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माहिती दिली.