कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:35+5:302021-09-10T04:21:35+5:30
पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक धनवडे होते. यादरम्यान त्यांनी कोरोना संक्रमणाचे भान ठेवून प्रशासनाने घालून दिलेल्या ...

कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची गय नाही
पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक धनवडे होते. यादरम्यान त्यांनी कोरोना संक्रमणाचे भान ठेवून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलींचे पालन करण्याच्या आवाहनाबरोबरच कायदा व सुव्यवस्था याची आपल्याला सांगड घालून लोकशाही पध्दतीने काम करायचे आहे. गणेशोत्सव साजरा करा, पण उत्साहाच्या भरात चुकीच्या नियमांचा अवलंब करू नका, असे धनवडे यांनी सांगून मला पहूर येथे कायदा सुव्यवस्थेच्या कारणांमुळे प्रशासनाने नियुक्ती दिल्याने प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घालण्यातला अधिकारी मी नाही, असे धनवडेंनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रदीप लोढा, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, ॲड. एस. आर. पाटील, माजी सरपंच शंकर जाधव, अशोक जाधव, विवेक जाधव, योगेश भडांगे, ज्ञानेश्वर करवंदे, विश्वनाथ वानखेडे, मिनाज शेख, गणेश पांढरे, शांताराम लाठे, शिवाजी राऊत, योगेश बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शांतता समिती बैठकीवर बहिष्कार
पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादानंतर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या कार्यपध्दतीवर राजकीय पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून पोलीस स्टेशनच्या बैठकांवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बोलाविलेल्या शांतता समितीच्या बैठकीला उपस्थिती दिली नाही. अरुण धनवडे विरूद्ध राजकीय पदाधिकारी असे चित्र दिसून येत आहे. धनवडे नियुक्त झाल्यापासून विविध प्रकारच्या त्यांच्या कार्यपध्दतीचा विषय चर्चेचा ठरत आहे.