अपघाताला आमंत्रण देत आहे, बोदवड येथील पुलाचा खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 22:13 IST2020-10-06T22:13:22+5:302020-10-06T22:13:28+5:30
कार्यवाहीची मागणी

अपघाताला आमंत्रण देत आहे, बोदवड येथील पुलाचा खड्डा
बोदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जामनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कामसाठी मोठा खड्डा खणल्याने हा खड्डा धोकादायक ठरला आहे.
येथील गटार पूर्णपणे भरल्याने त्याचा भराव व घाण पाणी हे रस्त्यावर तर काहींच्या दुकानात जात होते, त्यामुळे गत आठवड्यात येथे खोदून मोठा खड्डा करण्यात आला परंतु आज पावेतो हा खड्डा बुजवला नसून पूलही दुरुस्त करण्यात आला नाही.
आठवडाभरापासून काम तसेच पडल्याने या रस्त्यावरून जाणाºया येणाºया वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याच प्रमाणे या खड्ड्याजवळ कोणत्याच प्रकारचा सावध करणारा फलक लावला नसल्याने या रस्त्यावरून रात्री बेरात्री भरधाव येणारी वाहने यात पडण्याचा धोका वाढला आहे.
याकडे संबंधित महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.