लोणजे, ता. चाळीसगाव येथील खून प्रकरणातील शिक्षा झालेल्या काही आरोपींना न्यायालयाने अपिलात जाण्यासाठी जामीन मंजूर केला होता. खंडपीठातून या आरोपींना जामीन मिळाला होता. मात्र, त्यानंतर यातील दोन आरोपी परत न्यायालयात हजरच झाले नाही. त्यातील एका आरोपीचा तर मृत्यू झाला होता. पोलिसांचे पथक वारंवार तपासाला जायचे तर ते गावात नसल्याचे सांगितले जात होते. अशातच त्यातील एक जण मध्य प्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे समजले. मात्र, त्याआधी त्याचा शोध सुरूच होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील जितेंद्र पाटील यांनी संबंधित आरोपीचा मयताचा दाखल मिळविला व तो न्यायालयात सादर केला होता. आरोपीच्या मृत्यूचा दाखला मिळेपर्यंत त्याचा मृत्यू झाला, हे सिद्ध होत नाही त्यामुळे अनेक प्रकरणात आरोपीच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच राहतो, हे या प्रकरणावरून सिद्ध झाले.
कोट...
फरार आरोपींच्या शोधार्थ दरवर्षी विशेष मोहीम राबविली जाते, त्याशिवाय न्यायालयाकडून जशी प्रकरणे येतात तशी ती संबंधित पोलीस ठाणे पातळीवर पाठविली जातात. वाॅरंटसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्तीला असतो. त्यामुळे त्याची अंमलबजावणी केली जाते. जळगाव पोलीस दलाची फरार आरोपीचा शोध घेण्याची कामगिरी चांगली आहे.
-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक