अवैध लाकडाचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:51 IST2019-02-06T23:50:49+5:302019-02-06T23:51:09+5:30

वनविभागाने जप्त केला

 Invalid wooden truck seized | अवैध लाकडाचा ट्रक पकडला

अवैध लाकडाचा ट्रक पकडला

चाळीसगाव : लाकडी अवैध वाहतूक करणार ट्रॅक वनविभागाने जप्त केला.
चाळीसगाव प्रादेशिक वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे, वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक अजय महिरे, मंदा मोरे, वनमजुर हे मंगळवारी दुपारी कुंझर गावादरम्यान गस्त घालत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास दहीवद गावाजवळ अरुण बाजीराव पाटील यांच्या शेतात लाकडे भरत असलेला ट्रक त्यांना दिसला. परवानगी न घेता झाडे कापून ट्रकमध्ये (क्रमांक एम.एच. १८, ७०८८) भरत असताना आढळले. एकूण ८ घनमीटर लाकुड असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी वाहन चालक मुलकीत खान रा आयशा नगर, मालेगाव व व्यापारी मजहर खान, रा. मालेगाव या दोघांच्या विरोधात वनपाल प्रकाश देवरे यांच्या फिर्यार्दीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वनरक्षक अजय महिरे करीत आहेत.

Web Title:  Invalid wooden truck seized

टॅग्स :Jalgaonजळगाव